सारोळा चौकात भेटलेला स्मार्टफोन तपघाले गुरुजींनी दिला पोलीस ठाण्यात.
विवेकानंद पोलीसांनी केले सत्कार आणि कौतुक
लातूर दि ०९ डिसेंबर शहरातील सारोळा चौकात काल दि य०८ डिसेंबर रोजी सायंकाळी मारोती तपघाले गुरुजींना स्मार्ट फोन सापडला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात जमा केला असुन त्यांच्या या कृत्याने पोलिसही भाराहुन गेले होते. समाजात मारोती तपघाले गुरुजींसारखे प्रत्येकांनी वागावे व गुरुजींना प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस अंमलदार गोकुळ ढगे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या हस्ते पुष्प देऊन कौतुक केले आहे. सदर फोन हा सागर धोंडीराम चव्हाण राहणार किनीथोट तालुका औसा यांचा असुन रियल मी सेवन आय कंपनीचा अँड्रॉइड फोन आहे.