पञकार दिनानिमित्त विविध पुरस्काराने सुतार, तोष्णीवाल, भांगे यांच्यासह अनेक पञकार व संपादकांचा होणार सन्मान.पञकार दिनानिमित्त विविध पुरस्काराने सुतार, तोष्णीवाल, भांगे यांच्यासह अनेक पञकार व संपादकांचा होणार सन्मान.

पञकार दिनानिमित्त विविध पुरस्काराने सुतार, तोष्णीवाल, भांगे यांच्यासह अनेक पञकार व संपादकांचा होणार सन्मान.

नांदेड प्रतिनिधी : दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार, स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार हिंगोलीचे संपादक नंदकिशोर तोष्णीवाल यांना तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार लातूर येथील पुरुषोत्तम भांगे यांना जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 5 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिनी सह्याद्री हॉल, रेस्ट हाऊस नांदेड येथे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संपादक तथा संयोजक रुपेश पाडमुख व रामेश्वर धुमाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली अहे.

एल टी एन न्यूज आयोजित सुकन्सया क्षम क्रीडा प्रशिक्षण योजना लवकरच आपल्या सेवेत.

मीमांसा फाऊंडेशन, दै. समीक्षा, मिडीया पोलीस सोशल क्लब व मंथन क्रिएटीव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त आपल्या कार्यातून कर्तृत्वाची चमक दाखविणार्‍या वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे 16 वे वर्ष आहे. या वर्षी डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात चमक दाखविणारे मुंबई येथील लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांना जाहीर करण्यात आला. स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार हिंगोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रासह विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ संपादक नंदकिशोर तोष्णीवाल, कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार लातूरमध्ये अनेक वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत पुरुषोत्तम भांगे, कै. डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार ग्रामीण भागातून वृत्तपत्र क्षेत्रात हिरहिरीने अन्यायाला वाचा फोडणारे गाववालाचे गुणवंत विरकर, स्व. अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार नायगाव येथील दै. लोकमत समाचारचे अग्रेसर पत्रकार बालाजी नागठाणे, अगदी विपरीत परिस्थिती असतानाही सर्व अडचणीवर मात करुन अभिमानाने सा. कामगार वार्ताचे संपादक म्हणून कार्य करणार्‍या धर्माबादच्या संपादिका विजयालक्ष्मी सोनटक्के यांना दै. समीक्षा कर्तृत्व सन्मान पुरस्कार, लोहा येथील धडाडीचे दै. लोकमतचे पत्रकार गोविंद कदम यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईटस्‌ वर्कर पुरस्कार लातूरचे अनेक क्षेत्रात सेवेत राहणारे बाळासाहेब जाधव, स्व. अनंतरराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत हिंगोली लोकमतचे वितरण प्रमुख अरविंद सावळे, ग्रामीण भागात सातत्याने वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे हिमायतनगरचे केदार तातेवाड यांना स्व. अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्राील जाहीरातीचा आधारस्तंभ म्हणून दै. एकमतचे राहुल गजेंद्रगडकर, मंथन क्रिएटीव्ह डिजीटल मिडीया पुरस्कार सातत्याने बातम्यासाठी धडपडणारे ऊर्दू एमसीएनचे हैदर अली, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा म्हणजे संगणक चालक म्हणून मागील अनेक वर्षांपासून कार्यरत दै. देशोन्नतीचे प्रदीप वैद्य, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा असलेला फोटोग्राफर म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत धनंजय कुलकर्णी, स्व माधव अंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करत टीव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून मजल मारणारे यशपाल भोसले तर मुद्रण क्षेत्रात सेवा देणारे भारत शिंदे यांना स्व. सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

सदरील सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, सहसंपादक ज्ञानेश्वर पवार, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष सखाराम कुलकर्णी, कार्याध्यक्ष रमेश पांडे, प्रदेश सचिव दत्ताजी मोहिते, रमेश तिवाडी, सुनील कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्षा सौ. उज्वला दर्डा, उपाध्यक्षा सौ. सुनिता चव्हाण, सौ. संध्या सूर्यंशी, सौ. सविता गबाळे, उषा हडोळतीकर, शिवहरी गाढे तथा संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!