शांताई मंगल कार्यालयासमोर टिप्पर ॲटो अपघातातील आदित्य भोळेचा उपचारादरम्यान मृत्यु.
लातूर दि 04 जानेवारी शहरालगत असलेल्या रेल्वे फाटकाजवळ शांताई मंगल कार्यालयासमोर प्रवासी वाहतुक करणार्या ऑटो ला पाठीमागून मालवाहु टिप्पर ने दि 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात आज दि 04 जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या अपघातातील इतर प्रवासी व चालकास किरकोळ मार लागल्याचे समजते.
31 डिसेंबर रोजी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो क्रमांक एम एच 24 एबी 2941 ला पाठीमागून येणारी अनियंत्रित माल वाहतूक करणारी टाटा कंपनीचा हायवा क्रमांक एम एच 24 जे 9799 ने धडक दिल्यामुळे आदित्य बंडु भोळे वय 16 राहणार कासारगाव हा ऑटोच्या बाहेर पडला व पाठीमागून येणारी वरील वर्णनाची हायवा हातावरून गेली सोबतच फुफ्फुसाला मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याचे नातेवाईकांकडुन समजते.
