लातूर शहरातील 28 कॉफी शॉप मालकांवर मोठी कारवाई; लातूर पोलिसाची विशेष मोहीम
लातूर दि 10 एप्रिल कॉफी शॉप मालकांनी त्यांचे शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांचे नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पथकाने लातूर शहरातील विविध कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दिनांक 09 एप्रिल रोजी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत 28 कॉफी शॉप ना भेटी देऊन त्यातील 3 कॉफी शॉप मधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांचे चालका मार्फत तोडण्यात आले. तसेच 10 कॉपी चालक धारकांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 कलम 168 प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या आस्थापनाधारकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली : काही कॉफी शॉप धारक हे बेकायदेशीरपणे कॉफी शॉप चालवीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सदरची बाब जिल्हाधिकारी लातूर यांचे निदर्शनास आणून त्यांनी दिनांक 20 जून 2023 रोजी पासून लातूर जिल्ह्यात कॉफी शॉप/हॉटेल धारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.
काय आहे कॉफी शॉप/ हॉटेल धारकांसाठी नियमावली :
- सीसीटीव्ही फुटेज असणे बंधनकारक आहे.
- सर्व दरवाजे पारदर्श काचेचे असावेत.
- बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी असावी.
- अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट असू नयेत.
- सक्षम प्राधिकार्यासाठी भेट पुस्तिका ठेवलेली असावी.
- ध्वनी क्षेपक नियमांचे पालन करण्यात यावे.
- धूम्रपान करण्यास सक्त मनाई असावी.
- शासनाने दिलेल्या वेळेतच चालू ठेवता येतील.
वरील नियमांचे पालन न केल्यास कॉफी शॉप व हॉटेल धारकांनी विरुद्ध कायदेशीर करण्यात येते.