धारशिव येथे राज्य शालेय तायक्वांदो पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार
धाराशिव दि 09 जाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने लातूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा काल दि 08 जाने रोजी जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार जेष्ठ तायक्वांदो क्रीडा मार्गदर्शक जि बी कासराळे यांच्या हस्ते झाला असुन या खेळाडुंनी डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे 14, 17 व 19 वयोगटातील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पदक विजेते ठरले आहेत. विजेते खेळाडुतील श्रुती वारे, प्राप्ती सोमवंशी, निशा चव्हाण. हर्षवर्धन शिंदे या खेळाडूने कांस्यपदक पटकावले मिळविले होते.
या खेळाडूंना जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे, माधव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी.बी. कासराळे, किरण वैद्य, सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, रवींद्र जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
