तायक्वांदो राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदतायक्वांदो राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद

महाराष्ट्रातील खेळाडु ११ सुवर्णपदक, ६ रौप्यपदक व ८ कांस्यपदकांचे ठरले मानकरी…

बीड : ६७ वी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४ बेतुल, मध्य प्रदेश येथे ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२४ ला अतिशय उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने ११ सुवर्णपदक, ६ रौप्यपदक व ८ कांस्यपदकांसह नेहमीप्रमाणे निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत एकूण ११ सुवर्णपदक, ६ रौप्यपदक व ८ कांस्यपदक मिळविले आणि एकूण ६ टीम चॅम्पियनशिप पटकविल्या आहेत. १४ वर्षे मुले प्रथमस्थान, १४ वर्षे मुली प्रथमस्थान व १४ वर्षे मुले व मुली सांघिक प्रथमस्थान पटकावले आहे. १९ वर्षे मुली द्वितीयस्थान, १९ वर्ष मुले द्वितीयस्थान व १९ वर्ष मुले-मुली सांघिक द्वितीयस्थान पटकवले आहे.

महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाडु ११ सुवर्णपदक, ६ रौप्यपदक व ८ कांस्यपदकांचे ठरले मानकरी…

निकाल- पदक विजेते १४ वर्षाखालील मुले- वेदांत मगदूम- सुवर्ण, मन्नतजोत सिंग- सुवर्ण, आर्यन पिंपळकर- सुवर्ण, हिमांशू खडग- कांस्य, सार्थक निमसे- कांस्य, हर्षल रक्षा- कांस्य १४ वर्षाखालील मुली- अनन्या रणसिंग-सुवर्ण, वैष्णवी बेरड- सुवर्ण, रिया भटकर- सुवर्ण, शालिनी चंदनशिव- रौप्य, प्रियांका वाबळे- कांस्य १७ वर्ष खालील मुले- अनिरुद्ध वाघमारे- रौप्य पदक, देवदत्त चव्हाण- रौप्य पदक १७ वर्षाखालील मुली- सिद्धी देंबे -सुवर्ण, सुहानी धनाल- सुवर्ण, तनुजा पवार- रौप्य, मयुरी धुमाळ- कास्य १९ वर्षाखालील मुले- रेहान गुड्डूर- सुवर्ण पदक , अभिषेक सुकले- सुवर्ण पदक, कृष्णा मिश्रा- कांस्य पदक, मयूर- कांस्य पदक १९ वर्षाखालील मुली- श्रुतिका टकले- सुवर्ण, नीलम जोशीलकर- रौप्य, स्नेहल वांजळे- रौप्य, तन्वी जागडे- कांस्यपदके जिंकली आहेत.

सुकन्या सक्षम क्रीडा प्रशिक्षण योजना
सुकन्या सक्षम क्रीडा प्रशिक्षण योजना

क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे साहेब तसेच सहसंचालक सुधीर मोरे सर यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे तायक्वांदो या खेळाच्या स्पर्धा तालुक्यापासून ते राज्यापर्यंत विना वादविवाद, खूप कमी कालावधीत सुरळीतपणे यशस्वी पार पडल्या. त्यामुळेच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी महाराष्ट्राला राष्ट्रीय शालेय स्पर्धेत भरभरून पदके मिळवून दिली. राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून किरण गुरव, प्रमोद कदम, प्रेमावती पाटील, श्रुतिका मांडवकर, तुषार शिनाळकर , संघ व्यवस्थापक म्हणून अतुल राठोड व अमरावतीचे क्रीडा अधिकारी दीपक समुद्रे यांनी काम पाहिले.

सर्व पदक विजेत्यांचे क्रीडाआयुक्त सुहास दिवसे, अमरावती विभागाचे उपसंचालक विजय संतान, क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते तथा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई चे महासचिव श्री मिलिंद पठारे, ठाणे संघटनेचे महासचिव श्री संदीप ओंबासे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील व दुलीचंद मेश्राम, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, निरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर, तांत्रिक समिती सदस्य प्रमोद दौंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

बातमी व शब्द संकलन डाॅ. अविनाश बारगजे बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!