जी पी एफ साठी शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक लातूर कार्यालयापुढे निदर्शने.
राज्यातील एकमेव धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे जीपीएफ बंद.
लातूर दिनांक 15 एप्रिल कोणतीही लेखी आदेश न काढता धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांचे जीपीएफ बंद करण्यात आले आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शिक्षकांनी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली तर तात्काळ जीपीएफ पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी केली.

राज्यातील फक्त धाराशिव जिल्ह्यातीलच शिक्षकांचे धाराशिव शिक्षण अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे जीपीएफ खाते बंद ठेवण्यात आले आहेत हे जीपीएफ खाते त्वरित चालू करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी आज दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली व निवेदन दिले या निवेदनावर उपसंचालक श्री मोरे यांनी सखोल चौकशी करत मार्ग काढला आहे मात्र जीपीएफ खाते कोणत्याही नोटीसी शिवाय बंद केल्यामुळे आता कोणाच्या आदेशाने चालू करायची हा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यालाही मार्ग काढून पुढील सात दिवसात यावर कार्यवाही करून मार्ग काढावा अशी सूचना धाराशिव शिक्षण विभागाला संचालक मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक मुख्याध्यापक माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षकांसह मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत संग्राम विश्वासराव, जिल्हा सचिव जी व्ही माने धाराशिव जिल्हाध्यक्ष शेरखाने, लातूर जिल्हा उपाध्यक्ष पठाण यांच्यासह अनेक शिक्षक संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.