घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लुटायचे; लातूर पोलीसांच्या हातुन कसे सुटायचे!
सोन्या-चांदी चे दागिने व रोख रक्कम 01 लाख 10 हजार रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत.
दोन आरोपी अटकेत तर घरफोडीचे चार गुन्हे उघड; पोलीस स्टेशन विवेकानंद चौक ची कारवाई.
लातूर दि 17 एप्रिल काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी विवेकानंद चौक पोस्टे हद्दीतील परिसरात घरचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, रणजीत सावंत पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला नमूद घराचे कडे कोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची बातमीदार मार्फत माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने म्हाडा येथील दोन आरोपींना ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) सुशांत शिवाजी गायकवाड, वय 26 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी लातूर 2) कृष्णा ऊर्फ किरया गुंडेराव लोंढे वय 22 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी लातूर असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी म्हाडा कॉलनी लातूर येथे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या चार ठिकाणीच्या घराचा कुलूप-कोंडा तोडून घरामध्ये चोरी केल्याचे सांगून चोरी केलेला मुद्देमाल हा सुशांत शिवाजी गायकवाड याचे घरात लपून ठेवला असल्याचे सांगितल्याने आरोपीचे घरातून त्यांनी चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 10 हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरचा मुद्देमाल हा पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील चार घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक करीत आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, रणजीत सावंत पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे ,पोलीस अमलदार खुर्रम काझी ,यशपाल कांबळे, गणेश यादव, रवी गोंदकर, रणवीर देशमुख, आनंद हल्लाले, संजय बेरळीकर, महारुद्र डिगे , रमेश नामदास,अनिता सातपुते, दीपक बोन्दर यांनी केली आहे.