पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक आईने आधूनिक जिजाऊ बनणे अत्यावश्यक – प्रा. मोटेगावकर
बंधन लॉन्स येथे आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात हजारो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती.
अकोला (प्रतिनिधी) : निट आणि जेईईच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश प्राप्तीकरीता आरसीसी शिक्षकांच्या अथक व प्रामाणिक परिश्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या आईने घरामध्ये आधुनिक जिजाऊची भूमिका पार पाडणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षण पंढरी लातूर पॅटर्नचे प्रमुख तसेच आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांनी स्थानिक बंधन लॉन्स येथे रविवारी आयोजित मार्गदर्शन तथा व्याख्यान कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना परिक्षा मार्गदर्शनासोबतच पालकांनाही त्यांची भूमिका स्पष्ट करुन सांगितली.
मागील २४ वर्षात आरसीसी निट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परिक्षेमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर देशात सर्वोत्कृष्ठ निकाल देवून महाराष्ट्रात आरसीसीने प्रथम क्रमांकावर असल्याचे वारंवार सिध्द केले आहे. विदर्भातील अकोला शाखेनेही अल्पावधीत सर्वोत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवत आरसीसीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अशा गुणवंत टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन याकरीता अकोला येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अकोला शाखेने पहिल्याच वर्षी उत्तुंग निकाल देत विदर्भातही आरसीसी नंबर वन असल्याचे सिध्द करुन दाखविले आहे.

आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रा. मोटेगावकर सर यांच्यासोबतच टॉपर विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव व आतिषबाजी करत स्वागताने केल्या गेली. याप्रसंगी बोलताना प्रा.मोटेगावकर सर म्हणाले की, अकोला शहरात आम्ही कुणाशी स्पर्धा करण्याकरीता आलो नसून या भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ठ शिक्षण मिळावे याकरीता आलो आहे. आईवडीलांचे स्वप्न साकार करण्याकरीता दोन वर्ष स्वताला अभ्यासात झोकून देत एकप्रकारे पेटून उठा. तुमच्यासमोर उज्जल भवितव्य आहे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच दहावीनंतर काय ? व निट परिक्षेची तयारी कशी करावी याबाबतही त्यांनी यथायोग्य मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना दिशा दिली. परीक्षा काळात गोंधळून न जाता परिक्षेमध्ये आरसीसीच्या अभ्यासक्रमाबाहेरचे काहीही येणार नाही याचीही त्यांनी ग्वाही दिली. तसेच केवळ शिक्षणानेच गरीबी दूर होवू शकते असे सांगत विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. ही दोन वर्ष मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आला. गत २४ वर्षातील आरसीसीचे यश हे केवळ विद्यार्थ्यांची मेहनत व आरसीसी शिक्षकवृंदांचे प्रामाणिक प्रयत्न याची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विरेंद्र होमराव, राजे सर, माजी नगरसेवक आशिष पवित्रकार उपस्थित होते. याप्रसंगी आरसीसीच्या अकोला शाखेसोबतच इतर शाखेमधून टॉपर राहलेले व सध्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही प्रा. मोटेगावकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला आरसीसी शाखाप्रमुख डॉ. गोकुळ राख सर यांनी केले. यावेळी सर्व आरसीसी टीम उपस्थित होती. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये अड. प्रल्हाद गड्डमवार व सर्व स्टाफनी मेहनत घेतली सुत्रसंचालन आरसीसीचे कुलदीप कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून आईवडीलांचा सन्मान राखण्याची शपथ घेवून या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.