लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, लातूर 2025-26 नूतन कार्यकारणी जाहीर.
लातूर दि 29 एप्रिल औद्योगिक तथा कामगार न्यायालय, लातूर येथील वकील मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन ही कार्यकारणी सन 2025 व 26 या सालासाठी कार्यरत राहणार आहे.
सदर निवडणुक प्रक्रिया ही विधिज्ञ उमेदवारांच्या तथा सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध पार पडली. या प्रक्रियेमध्ये सर्वानुमते जेष्ठ विधिज्ञ गोपीनाथ एस. पवार यांची अध्यक्षपदी तर ॲड. भगवान व्ही. गवळी यांची सचिव पदी निवड करण्यायत आली. तसेच उपाध्यक्ष पदी ॲड अजिंक्य पी. देशमुख, सहसचिव पदी ॲड चैतन्य एन. इटकरी, कोषाध्यक्ष पदी ॲड सौ. ज्योती एस. जाधव तसेच सन्मानणिय सदस्य म्हणून ॲड सौ. एन.एन. देवताळकर व ॲड मनोज पी. लांडगे यांची उस्फुर्त निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून जेष्ठ विधिज्ञ ए.बी. शेख यांनी काम पाहिले. उपरोक्त निवडीबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्व विधिज्ञाकडुन स्वागत करण्यात आले तर यावेळी पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.