‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ साठी लातूर जिल्ह्यातील सात जणांची निवड.
लातूर दि 29 एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पोलिस विभागात विविध प्रवर्गात केलेल्या प्रशंनिय तसेच उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी,अंमलदारांना राष्ट्रपती पदक, शौय पदक तसेच पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह , बोधचिन्ह देवून गौरविले जाते. त्याआनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी लातूर जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी व अमलदारांची सन्मानचिन्ह पदाकसाठी निवड केली आहे. यामध्ये
1) मनीष मधुकरराव कल्याणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर.
2) रामदास साहेबराव मिसाळ, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, लातूर.
3)शेख युसुफ इब्राहिम, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, लातूर.
4) विलास संतराम फुलारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद पोलीस ठाणे लातूर.
5) कीर्ती मधुकर दोरवे, मोटार परिवहन विभाग, लातूर
6)सचिन शेषराव मुंडे, चालक पोलिस अमलदार, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर.
7)गणेश पांडुरंग दळवे, पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, लातूर. यांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह पदकावर लातूर जिल्हा पोलीस दलातील सात पोलिस अधिकारी अंमलदारांनी आपले नाव कोरल्याने जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक पटकावलेल्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना महाराष्ट्र दिन 1 मे रोजी सदर सन्मानचिन्हाचे वितरण होणार असून नमूद पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या सेवेत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सदरचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.