रेणाच्या चेअरमनपदी अनंतराव देशमुख व व्हा चेअरमनपदी प्रविण पाटील यांची बिनविरोध निवड
दिलीप नगर (निवाडा) – नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख,जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले.
आज दि. २२ एप्रिल २०२५ रोजी चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडी साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेअरमन पदासाठी अनंतराव देशमुख व व्हा चेअरमन पदासाठी प्रविण पाटील यांचे अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन माळी यांनी जाहीर केले.

नुतन चेअरमन अनंतराव देशमुख व व्हा चेअरमन प्रविण पाटील यांचा सत्कार कारखान्याचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक माजी आमदार त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंत पाटील, माजी चेअरमन सर्जेराव मोरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संत शिरोमणीचे चेअरमन शाम भोसले, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ,धनराज देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी,संग्राम माटेकर, तानाजी कांबळे, संभाजी रेड्डी, तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील, शंकरराव पाटील रणजीत पाटील, सतीश पवार, बालाजी हाके,वैशालीताई माने,अमृताताई माने, कार्यकारी संचालक बी व्ही मोरे,स्नेहल देशमुख पंडितराव माने, माजी संचालक प्रेमनाथ आकणगिरे, शहाजी हाके, अधिकारी,कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
