आरटीओ असल्याचा बनाव करत वाहनाकडून पैसे उकळणाऱ्या 02 ठगास पोलिसांनी केले जेरबंद.
बनावट आरटीओ वाहन, मोबाईल व रोख रकमेसह एकूण 11,58,000 चा मुद्देमाल जप्त.
बीड प्रतिनिधी : दि 10 मे बीड बायपास येथे आरटीओ अधिकाऱ्याचा बनाव करून वाहनाकडून पैसे उकळणाऱ्या दोन ठगास बीड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ बनावट आरटीओ वाहन मोबाईल सह 43 हजार रुपये रोख असा एकूण 11 लाख 58 हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांच्या दि 08 मे 2025 रोजी पो.स्टे.बीड ग्रामीण येथे बीड बायपास रोड येथे दोन ईसम गणवेश धारण करुन परिवहन विभागाचे लोगो व कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या हुबेहूब दिसणाऱ्या स्कॉर्पीओ वाहनाचा वापर करुन खोटा लोकसेवक असल्याचा बनावा करुन बेकायदेशिर लोकांकडुन पैसे वसुल करीत असल्याच्या फिर्यादीवरून पो.स्टे.बीड ग्रामीण येथे गुरनं 128/2025 क.204, 318(4),205,126(02) भादंवि प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.

सदरील गुन्हयांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक, बीड यांनी पो.नि. श्री.उस्मान शेख यांना निर्देश दिले होते. त्यावरुन पो.नि.स्था.गु.शा.यांनी अधिनस्त ग्रेपोउपनि तुळशिराम जगताप यांचे पथकास तात्काळ पाचारण करुन आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. फिर्याद मधील आर.टी.ओ. वाहनाप्रमाणे दिसणारी स्कॉर्पीओ वाहनाचा बीड जिल्ह्यात गोपनिय माहितीद्वारे माहिती घेवुन खात्री लायक माहितीअंती RTO सारखीच पुर्णपणे दिसणारी गाडी पोलीसांनी दोन आरोपीसह ताब्यात घेतले. त्यातील एक इसम हा आर.टी.ओ.चे गणवेशात दिसुन आला. त्याचे टोपीवर मपोसे नावाचा बॅच लावलेला होता. त्याचे उजव्या खांद्यावर दोन स्टार व डाव्या खांद्यावर एक स्टार तसेच दोन्ही खांद्यावर मपवि (महाराष्ट्र परिवहन विभाग) असे बॅच लावलेले होते. त्या दोघांना वाहनाचे खाली उतरुन विचारपुस केली असता त्यांनी आम्ही वडाळा येथे नेमणुकीस असल्याची सांगितले व त्यांना संशय आल्याने त्यातील एक जन पळुन जाण्याचे प्रयत्नात असतांना पथकाने पकडला. दोन्ही इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांचे नावे

1) अजय बालाजी गाडगे वय 24 वर्षे, रा.अम्रत नगर, घाटकोपर मुंबई
2) दिनेश मंगल धनसर वय 38 वर्षे रा. कल्याण, मुंबई
असे सांगितले. त्यातील अजय गाडगे यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांने सांगितले की, तो कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत नाही, मागील 10 दिवसांपुर्वी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली होती, सदर स्कॉर्पिओ वाहनाला हुबेहूब आर.टी.ओ. कार्यालयात वापरात येणाऱ्या वाहनासारखे बनविले व आर.टी.ओ. सारखे कपडे शिऊन घेवुन ते परिधान करुन त्याचे भाऊजी सोबत दोन दिवसांपासुन घाटकोपर येथुन निघुन नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर व बीड येथे वाहन आडवुन मी आर.टी.ओ. असल्याचे भासवुन त्यांची फवणुक करुन त्यांचेकडुन रोख व ऑनलाईन रक्कम घेतली असुन गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सदर आरोपीतांचे ताब्यातुन रोख 43000/-, चार मोबाईल, एक बनावट आर.टी.ओ.स्कॉर्पीओ वाहन असा एकुण 11,58,000/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पो.स्टे.बीड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पो.स्टे.बीड ग्रामीण करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री.नवनीत काँवत, सचिन पांडकर अपर पोलीस अधिक्षक बीड, पो.नि. उस्मान शेख स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.बीड पथकातील ग्रेपोउपनि तुळशिराम जगताप, पोह/मनोज वाघ, कैलास ठोंबरे, विकास वाघमारे चालक पोह/ शिवाजी खवतड व गणेश विघ्ने मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,बीड यांनी मिळुन केली आहे…
