भारत विकास परिषद सिद्धेश्वर शाखेच्या शिबिरात 104 जणांचे रक्तदान
लातूर /प्रतिनिधी: भारत विकास परिषदेच्या सिद्धेश्वर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 104 जणांनी रक्तदान केले. शहरातील रक्तपेढ्यामध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हळणीकर रुग्णालयाचे संचालक डॉ.र चंद्रशेखर हळणीकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी देवगिरी प्रांत अध्यक्ष अमित कुलकर्णी, शाखेचे अध्यक्ष विशाल अयाचित,सचिव अभिजीत पाटील, शिबिर प्रमुख शिवानंद मठपती यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ.हळणीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले. ज्येष्ठ बालरोग तज्ञ तथा भालचंद्र रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ.भातांब्रे यांनी शिबीरस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.क्षेत्रीय सचिव विश्वास लातूरक,र लातूर शाखा अध्यक्ष सुयोग जोशी, सचिव रतन झंवर, मुकुंद पाठक, शिरीष कुलकर्णी, सुभाजी मेनकर यांनीही भेटी दिल्या.
या शिबिराच्या निमित्ताने नवीन सदस्यांनी भारत विकास परिषदेचे सदस्य सदस्यत्व स्वीकारले. सुरेश बंग, त्यांच्या सौभाग्यवती, दोन मुले व सुना अशा संपूर्ण परिवाराने या शिबिरात रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा अधिक सहभाग होता. महिलांचीही संख्या लक्षणीय होती. या शिबिरात अनेकांनी पहिले रक्तदान केले.रक्त संकलनासाठी भालचंद्र रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भूषण दाते व बालाजीराव बिरादार तसेच डॉ.र हळणीकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या परिवारासह रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवानंद मठपती व आभार प्रदर्शन अभिजीत पाटील यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनंतराव बिरादार, अरविंद हळणीकर, सर्वोत्तम कुलकर्णी, विकासराव डोईफोडे, संतोष मद्दे, चेतन भंडारी, जगदीश तोष्णीवाल, राजन अयाचित,श्याम मलवाडे,दीपक पडिले, प्रवीण होळीकर,मोतीलाल वर्मा, भीमाशंकर राघो, भगीरथ धूत, रुपेश अंधारे, भंवरलाल झांगिड, अंबादास गोसावी, शिवाजीराव भारती, अजय रेणापुरे,अनुराग झंवर यांनी पुढाकार घेतला.