जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस चे निदर्शने.
लातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा अधिवेशनात संमत केलेला आहे. या कायद्या मधील तरतुदी ह्या लोकशाही प्रणालीच्या विरूध्द आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम या अन्यायकारक ठरणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राहीली आहे.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुरक्षा कायद्या च्या विरोधामध्ये आज १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये निवेदन देण्यातआले.
या निवेदनाद्वारे जन सुरक्षा विधेयक हे संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारे असून सरकारच्या असंविधानिक, चुकीच्या धोरणावर जो जो विरोधी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक टीकाटिपणी करतील, सरकारच्या विरोधात बोलतील न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील अशा सर्व पक्ष संघटना नागरिक यांच्याविरुद्ध बिना चौकशी फौजदारी कारवाई करण्याची तरतूद या जाचक विधेयकात असून या कायद्याचा वापर सरकार त्यांच्या फायद्यासाठी करण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे जनसुरक्षा विधेयक सरकारने मागे घ्यावे अन्यथा या विधेयका विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमकपणे तीव्र जन आंदोलन उभा करेल असा इशारा दिला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके, लक्ष्मण कांबळे, गोरोबा लोखंडे, दगडू आप्पा मिटकरी, कैलास कांबळे, ॲड.फारुख शेख प्रा. सुधीर अनवले, प्रा. प्रविण कांबळे, सुंदर पाटील, इमरान सय्यद, सहदेव मस्के, व्यंकटेश पुरी, सिकंदर पटेल, नागसेन कामेगावकर, हमीद बागवान, इसरार सगरे, ॲड. विजय गायकवाड, यशपाल कांबळे, व्यंकट पुरी, जालिंदर बर्डे, संजय ओव्हळ, ॲड.शरद देशमुख, असलम शेख, जी ए गायकवाड, भाऊसाहेब भडीकर, अशोक सूर्यवंशी, राजु गवळी, राहुल डूमणे, अजय वाघदरे, श्रीकांत गर्जे, शैलेश भोसले, नितीन कांबळे, ॲड. गणेश कांबळे, पवनकुमार गायकवाड, राजकुमार माने, किरण बनसोडे, राजाभाऊ गायकवाड, अभिजित इगे, अकबर माडजे, पिराजी साठे, युनूस शेख, सोमेन वाघमारे, मिटकरी ताई, करुणा ताई शिंदे, भास्कर शिंदे, अभिषेक देशमुख, रामराजे जाधव, अविनाश बट्टेवार , बाबा शेख, काशिनाथ वाघमारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.