आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात रंगणार जुडोच्या स्पर्धा; जिल्हा क्रीडा अधिकारी कसगावडे यांची माहिती.
लातूर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघात दिनांक पाच नोव्हेंबर रोजी जुडो खेळाच्या विभागीय स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेसाठी लातूर विभागातील धाराशिव, नांदेड महानगरपालिका, नांदेड ग्रामीण, लातूर महानगरपालिका व लातूर ग्रामीण च्या मुली व मुले खेळाडूंची उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये जुडो खेळाचा प्रचार व प्रसार झपाट्याने होत असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात या स्पर्धा रंगत असल्यामुळे खेळाडूंना चांगले दिवस आले असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांनी आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात सांगितले आहे. प्रथमच या स्पर्धा औसा मतदार संघात होत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अमोल पाटोळे यांनी केले आहे.

