बिडवे मार्केटला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार दुकानांचे मोठे नुकसान.
अग्निशमन दल दाखल; आग नियंत्रणात.
लातूर प्रतिनिधी : शहरातील अशोक हॉटेल सिग्नल जवळ स्थित असलेल्या बिडवे मार्केट येथील चार दुकानांना भीषण आग लागून या आगीत मोठे नुकसान झाले असून ही आग दिनांक 29 व 30 ऑक्टोबर च्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या दरम्यान लागली असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे तर आग पहाटे साडेपाच वाजेपर्यंत नियंत्रणात आणण्यात आली आहे.
मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीत खुराणा ट्रॅव्हल्स ललित राज खुराणा, टॅक्स कन्सल्टंट रामलिंग स्वामी, वन अँड ओन्ली हेअर स्टाईल शॉप कपिल व एक्स-रे सेंटर सुनील ताडमाडगे यांच्या व्यवसायाच्या आस्थापनेतील कागदपत्रे टेबल खुर्च्या लॅपटॉप रोख रक्कम आगीच्या बक्षस्थानी सापडले आहे.

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले असून श्री दिवे, महाके, शेख, शिंदे, जाधव, माने, कराडे, भोये, अमर, देवरे, महल्ले यांनी ही आग नियंत्रणात आणली आहे. आग लागल्याचे वृत्त रात्री तीन वाजून आठ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाले तर घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाने धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली आली आहे. अशी माहिती लातूर मनपा अतिदक्षता विभागाचे अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली आहे.

