सना हॉस्पिटलच्या प्रकरणावर डॉक्टरांची पहिलीच प्रतिक्रिया; अतिरिक्त भुलमुळे महिलेचा मृत्यू ?सना हॉस्पिटलच्या प्रकरणावर डॉक्टरांची पहिलीच प्रतिक्रिया; अतिरिक्त भुलमुळे महिलेचा मृत्यू ?

एस एम सना हॉस्पिटलच्या प्रकरणावर डॉक्टरांची पहिलीच प्रतिक्रिया; अतिरिक्त भुलमुळे महिलेचा मृत्यू ?

हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून खंडण; अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही; वैद्यकीय समिती कडून तपास सुरू.

लातूर प्रतिनिधी : दिनांक 9 नोव्हेंबर रोजी एस एम सना हॉस्पिटल येथे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा अतिरिक्त भुलमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून सदर प्रकरणाचे एस एम सना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी खंडण केले आहे. रुग्णास कोणत्याही प्रकारचे भुलीचे इंजेक्शन देण्यात आले नव्हते असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे तर सदरील प्रकरणी वैद्यकीय समिती व पोलिस सूत्रांकडून तपास सुरू असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

शहरातील छञपती शाहु महाराज चौक येथे स्थित असलेल्या एस एम सना हॉस्पिटल येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या एका महिला रुग्णाचा दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील केम शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी नातेवाईकांनी रुग्णाला अतिरिक्त भूल दिल्यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप एस एम सना हॉस्पिटलचे डॉक्टर अफसर शेख यांच्यावर केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दिली असून हॉस्पिटल व डॉक्टरांची चौकशी करावी अशी मागणी या तक्रारीत केली आहे. या तक्रारी अर्जावर पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तात्काळ कारवाई करत हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत व वैद्यकीय समितीकडून तपास सुरू केला आहे. दरम्यान नातेवाईकाकडून हॉस्पिटलचे व हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाच्या डॉक्टरांच्या पदवी संदर्भात चौकशी करण्यात यावी असेही अर्जात म्हटले आहे तर सदर प्रकरणी पोलीस प्रशासन कसून चौकशी करत असून वैद्यकीय अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना सांगितले आहे.

एसएमएसन हॉस्पिटल येथे नियमित रुग्ण तपासणी व उपचार सुरू

दरम्यान डाॅक्टर अफसर शेख यांच्याशी सदरील प्रकरणी चौकशी केली असता दि 09 नोव्हेंबर रोजी एस एम सना हॉस्पिटल येथे ऑपरेशनसाठी आलेल्या महिला रुग्ण ऑपरेशन साठी ऑपरेशन गृहात घेतल्यानंतर तो घाबरल्यासारखा करत होता तेंव्हा आम्ही धिर देण्याचा प्रयत्न केला पण ह्रदयाची ठोके मंदावून ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचे जाणवल्यामुळे आम्ही तो रुग्ण ऑक्सिजन वर घेतला त्याच्या पुढील उपचारासाठी आम्ही नातेवाईकांच्या सहमतीने त्या महिला रुग्णास गुरूमाऊली रुग्णालयात हलवले. तिथे रुग्णाच्या नातेवाईकांचा दबाव वाढल्याने तिथेही पुर्ण उपचार न करता रुग्ण मुंबई येथील केम शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आला त्यानंतर मुंबई येथे रुग्णास पुरेसा उपचार मिळाला नाही. रुग्ण जवळपास 12 तासाहून अधिक काळ स्ट्रेचरवरच होता शिवाय प्रवासात 8 तास वेळ गेल्यामुळे रुग्णाची स्थिती हाताबाहेर गेली असल्याचे डाॅक्टर अफसर शेख यांनी सांगितले आहे ते पुढे असेही म्हणाले सदर रुग्ण एस एम सना हॉस्पिटल येथील स्ञिरोग तज्ञ महिला डाॅक्टर कुरेशी यांच्या निगराणी खाली उपचार घेत होता तर या प्रकरणी मला जाणिव पूर्वक बदनाम केले जात असुन माझी समाज माध्यमात मोठी बदनामी केली जात आहे. मि कायदेशीर कारवाईस तयार असुन रुग्णाच्या उत्तरीय तपासणी अहवालानंतर माझ्यावर आरोप करावा.

एस एम सना हॉस्पिटल येथे दाखल होऊन उपचार घेत असलेल्या त्या महिला रुग्णास पुढील उपचारासाठी नेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू होतो. हि घटना अत्यंत दुःखद असुन त्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पण परिस्थितीचे भांडवल करणाऱ्या एकाचाही आरोप सहन केला जाणार नसुन माझ्या मानसिक आणि सामाजिक नुकसानासाठी जबाबदार धरले जाणार आहे तर या प्रकरणी एकुण 11 जणांवर 10 करोड रुपयाचा अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. संबंधिताना न्यायालयातून वकिलामार्फत नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.

नातेवाईकांकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारी अर्जातील प्रत्येक मागणीची आम्ही पुर्तता केली आहे तर महानगरपालिका आरोग्य समितीने एस एम सना हॉस्पिटल व हॉस्पिटलच्या ऑपरेशन विभाग तपासला असून एस एम सना हॉस्पिटल पूर्ववत सुरू आहे तर रुग्ण तपासणी व उपचार नियमित सुरू असल्याचेही डाॅक्टर अफसर शेख यांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना सांगितले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!