पाचपीर नगर येथे एकास तलवारीने डोक्यात मारहाण; पायाचेही हाड तोडले.
जखमिची प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी रुग्णालयात दाखल.
सारोळा ग्रामपंचायत हद्दीतील पाचपीर नगर येथे होणाऱ्या बायकोबद्दल अपशब्द बोलल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नवरोबाला दोघांनी तलवार व धारधार शस्त्राने डोक्यावर मारून जखमी करत डाव्या पायाचे हाडही तुडल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 02 वाजण्याच्या दरम्यान घडली असून जखमीला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर प्रकरणी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जखमीवर उपचार सुरू आहे तर या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव सुरज पठाण असे आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

