लातूर शिवसेनेच्या वतिने मदनसुरीत संत रोहिदास जयंती साजरी.
निलंगा प्रतिनिधी : लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांच्या हस्ते मदनसुरीत संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली मदनसुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते करून महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रम यशस्वितेसाठी मदनसुरी येथील बालाजी शेषराव जाधव, जाधव पंडितराव, जाधव अंकुश, कांबळे दिलीप, जाधव सुनील, जाधव धीरज, जाधव नारायण, जाधव गोविंद, जाधव अनिता, जाधव मीरा, जाधव सुकुमार, जाधव बालिका, जाधव उषा, जाधव सावित्राबाई आदींनी परिश्रम घेतले

यावेळी मदनसुरी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, संजय शिंदे, दयानंद कोळपे, तात्या माने, गणेश विहिरे, तसेच नागरिक दिलीप जाधव, अशोक सूर्यवंशी, अशोक जाधव, जाधव राहुल माने, ओम प्रकाश, माने मुरलीधर, सूर्यवंशी दयानंद, कोळपे धनराज, लांडगे माधव, शिंदे गुलाब, माने वेंकट, राम माने, उद्धव माने उपस्थित होते.