गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूरात पोलिस तक्रार.
लातूर प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांच्या विरोधात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेमध्ये “तळवे चाटू” हा शब्दप्रयोग केला आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित कशी राहील या पद्धतीसाठी प्रयत्न करून गृहमंत्री पदावर असताना देशाला एकसंघ ठेवण्याचं काम केल पाहिजे होतं त्यांनी तशी शपथही मंत्रीपद घेतल्यानंतर घेतली होती. मी आकस बुद्धीने काम करणार नाही, सूड भावनेने काम करणार नाही, देशाची अखंडता राखेन. गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या प्रेरणास्थान असणारे शिवसेना परिवाराचे कुटुंबप्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढून तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला ठेच पोहोचवणार वक्तव्य अमित शहा यांनी केल्यामुळे लातूर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख श्री शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर पोलीस कार्यालयास पोलीस काल दि २१ फेब्रुवारी रोजी तक्रार देण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूरात पोलिस तक्रार.
यावेळी शिवसेना महिला आघाडी संघटिका सुनीताताई चाळक, युवा सेना अधिकारी अडवोकेट राहुल मातोडकर, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, योगेश स्वामी, हरिभाऊ सगरे, विष्णू साबदे, महानगर प्रमुख विष्णू साठे, महानगर संघटक बालाजी जाधव, विधानसभा प्रमुख एस आर चव्हाण, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके भागवत वंगे, मुकेश सुडे, तानाजी सुरवसे, शहर प्रमुख सुनील बसपुरे, माधव कलमुकले, युवराज वंजारे, शहर प्रमुख सुरेश दादा भुरे, सुनील नाईकवाडे, सतीश शिवने उपतालुकाप्रमुख ॲड नारायण माने, शंकर लंगर, बंकट माळी, भास्कर जाधव, प्रीती ताई कोळी, अलकाताई मुगळे, सुवर्णा वाघमारे, अजय घोणे अमोल आडे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.