संशय आला म्हणून पोलिसांनी हटकले; तोच निघाला १२ मोटारसायकलीचा चोर
गांधी चौक पोलीसांच्या विशेष पथकाच्या कारवाईत १२ मोटारसायकलीसह 4,35,000/- रुपयांचा मुद्देमालसह व आरोपी अटक
लातूर दि २४ फेब्रुवारी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी, लातुर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक श्री. प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते. तेंव्हा सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 20/02/2023 रोजी पथक सिद्धेश्वर यात्रेत पाई पेट्रोलिंग करीत असताना एक इसम मो. सा. ढकलत जात असताना दिसला म्हणून त्यास पोलीस पथकातील पोह दामोदर मुळे, पोह रणविर देशमुख पोह रणजीत शिदे पोह दत्ता शिंदे पोना शिवाजी पाटील पोना हनुमंत काटे यांनी त्यास पकडून त्याचे ताब्यातील मोसा बाबद विचार पुस केली त्यांने उडवा उडवीचे उत्तर दिले त्यास विश्वासात घेवून माहीती विचारली असता ति मो.सा. बसस्थानक लातुर येथुन चोरी केलेचे सांगीतले त्यास पो.स्टे. गांधी चौक गु.र.न -78/23 कलम-379 भादवि मध्ये अटक करुन अधिक तपास केले असता आरोपीने कोल्हापुर ,पुणे , अंबाजोगाई, लातूर येथुन 12 मो.सा किंमत-4,35,000/- हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेे.
1)आरोपी नाव- प्रकाश नागुराव मोरे वय-33 वर्षे रा- भालगाव ता .केज जि. बीड.
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या 12 गुन्ह्याची उकल करून 12 मोटार सायकलसह 4 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक श्री. प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोह दामोदर मुळे, रणवीर देशमुख , रणजित शिंदे, दत्ता शिंदे, भाऊसाहेब मंथलवाड सुदर्शन पाटील पोना- शिवाजी पाटील, शिवराज अनंतवाड. उपविभागीय कार्यालय शहर यांचे पथकातील- सफौ- ढगे, पारडे, सोनटक्के यांनी पार पाडली