छञपती शाहू महाराज पुतळा अनावरणासाठी ब्ल्यु पॅंथर संघटनेचे “झोपा काढो” आंदोलन
लातूर दि २४ फेब्रुवारी मागील काही महिन्यांपासून छञपती शाहू महाराज यांच्या लातूरातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मागे पडले आहे. हे अनावरणासाठी येथील लोकप्रतिनिधींकडून श्रेयासाठी अडवणूक केली जात आहे हे स्पष्ट दिसत असुन या बाबत ब्ल्यु पॅंथर संघटना आक्रमक होत आज दि २४ फेब्रुवारी रोजी छञपती शाहू महाराज चौकात शाहू महाराजांच्या झाकलेल्या पुतळ्या समोर लोकप्रतिनिधींचे मुकवटे परिधान करुन “झोपा काढो” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने आता तरी लोक प्रतिनिधी जागे होतील का? असा प्रश्न आंदोलकांना पडला होता. या आंदोलनाला शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या संघटना सामिल झाल्या होत्या.

या वेळी ब्ल्यु पॅंथर संघटनेचे अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड यांच्यासह दिनेश सावळे, नाना कांबळे, मनोज साबळे, निलेश कांबळे, विशाल कदम, पवन कांबळे, किरण गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, दीपक गगणे, अक्षय धावारे, आकाश इंगळे, शंकर नागभुजंगे, शेखर कांबळे, ऋषिकेश दिवे, अमन सुरवसे उपस्थित होते.