ट्रॅडिशनल शोतोकान कराटेचा शालेय राज्य स्पर्धेत डंका
कोल्हापूर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरिय शालेय कराटे स्पर्धेत ट्रॅडिशनल शोतोकान कराटेचा शालेय राज्य स्पर्धेत आपला डंका वाजवत पदकांची कमाई केली आहे. दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी रोजी बारामती येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील स्नेहल एकनाथ पाटील तृतीय क्रमांक कास्य पदक व प्रेरणा कृष्णात खाडे तृतीय क्रमांक कास्य पदक मिळवून यश संपादन केले आहेत. विजयी खेळाडुंना मुख्य प्रशिक्षक व ट्रॅडिशनल शोतोकान कराटे डो असोसिएशन चे अध्यक्ष प्रदीप माने यांचे मार्गदर्शन मिळाले असुन त्यांनी येणाऱ्या काळात सर्वाधिक पदक मिळवून कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावरणार असल्याचे मत लातूर नेता न्युज शी बोलताना व्यक्त केले आहे. विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.