चार महिनाचा पगार काढायला मागितले मटन आणि दारु; २५०० रु साठी प्राचार्य ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात.
लातूर दि १४ मार्च जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड, जि. लातूर येथे प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी, वय 58 वर्षे, यांनी तक्रारदार यांना त्यांचा चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून व त्यांची पेन्शन ची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्या करिता दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केली. थोड्या वेळाने लाच मागणी केलेली रक्कम घेवून तक्रारदार हे लोकसेवक यांना त्यांचे लातूर येथील कार्यालयात जावून भेटले असता प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी दारू व मटणाच्या पार्टी साठी मागितलेली लाचेची रक्कम 2,500/- रु. स्वतः पंचासमक्ष स्विकारली असता लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी लातूर येथे शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
या कामी डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर व टीम एसीबी लातूर भास्कर पुल्ली व अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले पुढील तपास पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर हे करत आहेत.