विश्वशांती बुद्ध विहाराच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष सोनवणे यांची निवड.
लातूर दि १९ मार्च भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2023 बैठकीचे आयोजन माजी नगरसेवक बाळासाहेब (पप्पू) देशमुख, सोपान बोडके सर दहीरे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . या बैठकीचे अध्यक्ष शेषराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जयंतीची कार्यकारणी ची निवड करण्याचे ठरवले असून खालील प्रमाणे मंडळाचे निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी संतोष गोरोबा सोनवणे सुचक विजय महादेव चौधरी यांनी संतोष गोरोबा सोनवणे यांचे अध्यक्ष म्हणून नाव सुचवले व विनोद माणिकराव गायकवाड यांनी त्यास अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदी राहुल केरबा सोनवणे, किरण जाधव, सचिव विजय महादेव चौधरी, कोषाध्यक्ष विजय काशिनाथ गायकवाड, सहकोषाध्यक्ष तुषार तातेराव कांबळे, तर संघटक पदी अमित सुधाकर दंडे, संजय चौधरी, सहसंघटक पदी अमित बालाजी धेंडे, तर कायदेशीर सल्लागार पदी ऍड भीमराव बुधोडकर यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी शुभम क्षीरसागर, सिद्धांत शिंदे, अनिकेत सूर्यवंशी, निहाल मोरे, तेजस शिखरे, सुमित घनघावे, वीरेन वाहुळे, शिवम मचकटे, प्रतीक घोडके, अनिकेत सोनवणे, योगेश पोटभरे, सार्थक इंगळे, सागर बनसोडे, प्रीतम घनगावे, सार्थक कांबळे, गोविंद भालेराव, कुशल बोडके, बालाजी उदारे, जयप्रसाद घोडके, रोहित दंडे, महादेव पोटभरे, पप्पू सोनवणे, गणेश मिरजे निवड करण्यात आली.