32 व्या राज्य सब जुनिअर तायक्वांदो क्रीडा स्पर्धेला सावर्डे येथे सुरुवात.
रत्नागिरी प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी संपन्न होत असलेल्या 32 व्या राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो क्रीडा स्पर्धेला काल दिनांक 16 मार्च रोजी सुरुवात झाली असून पुमसे क्रीडा प्रकारात ठाणे व फ्री स्टाईल पुमसे प्रकारात रत्नागिरी अव्वलस्थानी राहिले आहे तर याच प्रकारात मुंबई दुसर्या स्थानावर राहिली आहे.
या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आज पार पडणार असुन याकरिता उद्घाटनासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील 364 खेळाडु उपस्थित झाले आहेत. या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित केल्या असुन स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समिती व रत्नागिरी तायक्वांदो जिल्हा संघटनेचे व्यंकटेश कर्रा, लक्ष्मण कर्रा, शशांक गडशी, संजय सुर्वे हे प्रयत्न करीत आहेत.