बीडच्या यशस्वी चव्हाण ला राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक.
बीड जिल्हा संघाला राज्यात तिसरे स्थान
स्वराज घोडके, ओम कासट, सार्थक भाकरे, प्रतीक्षा आमटे ही चमकले !!!
६ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा, मुंबई
बीड – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मान्यतेने मुंबई येथे आयोजित सहावी महाराष्ट्र राज्य कॅडेट (मुले/मुली) तायक्वांदो स्पर्धेत बीड संघाने तिसरे स्थान पटकावले असून कु. यशस्वी चव्हाण हिने सुवर्णपदक , ओमकार सुरज घोडके यांनी २ रौप्य पदके तर सार्थक भाकरे व प्रतीक्षा आमटे यांनी २ कास्यपदके पटकावली आहेत. पुणे जिल्ह्याला प्रथम, मुंबईला द्वितीय तर बीडला तिसरे स्थान मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक तथा तक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.
युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पॅव्हेलियन, मरिन लाईन्स, मुंबई येथे १४ वर्षाखालील प्रथमच जागतिक संघटनेच्या नियमावलीनुसार उंचीनुसार झालेल्या स्पर्धेत मुलींच्या 148 सेमीखालील गटामध्ये मुंबई ,पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर ,नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंना पराभूत करून सुवर्णपदक जिंकले आहे. मुलांच्या गटात स्वराज घोडके व ओम कासट यांनी अंतिम फेरीपर्यंत झेप घेऊन २ रौप्य पदके जिंकली. सार्थक भाकरे व प्रतीक्षा आमटे यांनी देखील कांस्यपदके जिंकली आहेत. बीडच्या खेळाडूंच्या ५ पदकांसह या दमदार कामगिरीमुळे बीड संघाला राज्यात तिसरे स्थान मिळाल्याने चषक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपाध्यक्ष तथा तांत्रिक समिती प्रमुख प्रवीण बोरसे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घाडगे यांच्यासह आयोजक तायक्वांदो असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष सुनील यमगर , महासचिव विजय कांबळे, अविनाश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. २८ जिल्ह्यातील जवळपास ३५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सर्वाधिक ९ सुवर्णपदकांसह पुणे जिल्हा संघाने प्रथम स्थान पटकावले, 3 सुवर्णपदकांसह यजमान मुंबईला दुसरे स्थान तर बीड जिल्हा संघाला ५ पदकांसह क्योरोगी प्रकारात तिसरे स्थान या राज्य स्पर्धेत प्राप्त झाले. पूमसे प्रकारामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले, ठाणे जिल्ह्याला द्वितीय व पालघर संघाला तिसरे स्थान मिळाले. यश चव्हाण, श्रवण तांबारे, समर्थ आंधळे, यशराज मुंडे, सलोनी जवंजाळ ,स्वराली शिर्शिकर, दुर्गा गव्हाणे, श्रेया गुंड यांनीही या राज्य स्पर्धेत बीड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले. हे सर्व जिल्हा स्टेडियम येथील डॉ. अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू आहेत. शेख अनिस , ऋत्विक तांदळे यांनी प्रशिक्षक म्हणून तर बन्सी राऊत व नितीन आंधळे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. कुमारी यशस्वी चव्हाण हीची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंना माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी चव्हाण साहेब, योगेश करांडे यांच्यासह जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर, दिनकर चौरे, डॉ. अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्सी राऊत, भारत पांचाळ, प्रसाद साहू, प्रा. पी टी चव्हाण, सुनील राऊत, श्रीकांत पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू सचिन जायभाय, नवीन शेख, अमित मोरे , सचिन कातांगळे, नितीन आंधळे व बालाजी कराड यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.