लातूरच्या एमआयडीसीत 2000 रु च्या एक कोटीच्या नोटा देतो म्हटल्यावर 96 लाखांच्या 500 रुपयांच्या नोटा आणलेल्यास पोलिसांनी पकडले !
सदर घटनेची माहिती विचारण्यास गेलेल्या पञकारास अवमान जणक वागणुक देत मोबाईल काढून घेऊन तिन तास बसवून ठेवले.
लातूर दि 09 जुलै शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल 8 जुलैच्या रात्री (2000रु च्या नोटा) एक कोटी रुपये देतो म्हणून पाचशेच्या 96 लाखांच्या नोटा घेणार्या काही व्यक्तीस विवेकानंद चौक पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यावरून एम आय डि सी च्या हद्दीत वरिष्ठांना माहिती देत कारवाई केली. त्यानंतर विवेकानंद चौक पोलिसांनी सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यास वर्ग केला. आज 9 जुलैच्या सायंकाळपर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे व शहर डिवायएसपी भागवत फुंदे यांना या संदर्भात विचारणा केली असता, सध्या तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आज रात्री उशीरा सांगितले.
500 रुपयांच्या 96 लाखाच्या नोटा घेऊन बदल्यात 2 हजारांच्या नोटा बदलून एक कोटी देतो म्हणणार्या काही व्यक्तींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणीे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यत सुरू होती. याबाबत विशेष की, दुपारी एक पत्रकार याच गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना माहिती न देता त्यांचे दोन्ही मोबाईल पोलीस निरीक्षकानी काढून घेतले व त्या पत्रकारास दोन तास बसवून घेतले आणि त्यांना अपमानकारक वागणूक दिली. पत्रकारास पोलिसांनी अपमानकारक वागणूक दिल्याने शहरातील अनेक पत्रकारांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून पोलिस निरिक्षक दिवे व डिवायएसपी फुंदे यांना जाब विचारला असता हा प्रकार गैरसमजातून घडला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.