काँग्रेसच्या विधी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान रक्षणासाठी पुढाकार घ्यावा - माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन.काँग्रेसच्या विधी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान रक्षणासाठी पुढाकार घ्यावा - माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन.

काँग्रेसच्या विधी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान रक्षणासाठी पुढाकार घ्यावा.

माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर दि.१० सप्टेंबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी विभागाच्या वतीने काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी, काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुनजी खर्गे, काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी, भारताचे माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर सहकार महर्षी तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले ,विधिमंडळाचे नेते बाळासाहेबजी थोरात,विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार, माजी मंत्री तथा लातूर शहरचे आमदार अमितभैय्या देशमुख व लातूर ग्रामीण चे आमदार धिरजभैय्या विलासरावजी देशमुख,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष ॲड.रवी प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या शुभहस्ते विधी विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना काॅंग्रेस भवन येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. याबद्दल बाभळगाव येथे माजी मंत्री तथा आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांचे लातूर जिल्हा काँग्रेसच्या विधी विभागाचे नुतन अध्यक्ष अँड प्रवीण हणमंतराव पाटील, लातूर शहर विधी विभागाचे नुतन अध्यक्ष ॲड सचिन पंचाक्षरी
महाराष्ट्र प्रदेश विधी विभागाचे नुतन सचिव ॲड राजेंद्र काळे व महाराष्ट्र प्रदेश विधी विभागाचे नुतन सचिव ॲड दौलत दाताळ यांनी भेट घेतली .

यावेळी विधी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आ.अमितजी देशमुख यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन आभार व्यक्त केले त्यादरम्यान संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी विधी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले योगदान देण्याचे कार्य अविरतपणे करीत रहावे असे आवाहन केले.यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर ॲड दिपक सुळ लातूर जिल्हा सोशल मीडिया काॅंग्रेसचे अध्यक्ष प्रवीण सुर्यवंशी, श्री अविनाश बट्टेवार, श्री अजय वाघमारे, श्री सचिन कांबळे श्री शरद गायकवाड आदींची उपस्थिती होती .

माजी मंत्री तथा लातूर शहरचे आमदार अमितजी देशमुख, श्रीशैल्य उटगे, ॲड किरण जाधव, ॲड दिपक सुळ, ॲड प्रवीण पाटील, ॲड सचिन पंचाक्षरी, ॲड राजेंद्र काळे, ॲड दौलत दाताळ, प्रवीण सुर्यवंशी व अविनाश बट्टेवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!