शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सैनिक विद्यालयाचे वर्चस्व; १२ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
बीड प्रतिनिधी दि 06 ऑक्टोबर सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी याही वर्षी बीड तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व राखले असून १२ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती सैनिक विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत बीड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून बीड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुरज पवार यांने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. १७ वर्षाखालील गटात १५०० मीटर धावण्यामध्ये सुदर्शन सुभाष पवार यांने प्रथम क्रमांक मिळवला असून ३००० मीटर धावण्यामध्ये अमोल अमृता घोगरे यांने दुसरा क्रमांक मिळवला आहे. १०० बाय ४०० रिले मध्ये सैनिकी विद्यालयाच्या ओम शिंदे, बळीराम शेळके, विनायक बीरलिंगे, सुदर्शन पवार व माळी यांच्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ओम गिरे या विद्यार्थ्याला ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळाले आहे.
१९ वर्षाखालील वयोगटांमध्ये ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत आकाश मुकुंद शेळके यांने दुसरा क्रमांक मिळवला असून ५ हजार मीटर चालण्यामध्ये सागर संतोष केळगंद्रे यांने दुसरा तर भालाफेक मध्ये ओंकार सुनील जावळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच वयोगटात ६ हजार मीटर क्रॉस कंट्रीमध्ये सागर केंळगद्रे, ओंकार जावळे व सुरेंद्र मिसाळ यांनी प्रथम स्थान मिळवले आहे. या सर्व खेळाडूंना डॉ. अविनाश बारगजे, सैनिकी निदेशक मेघराज कोल्हे व विजयकुमार धारणकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर, संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर योगेशभैय्या क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर दीपाताई क्षीरसागर, प्राचार्य डाके एस ए यांनी विजेत्या खेळाडूंच्या अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.