वन्यजीव सप्ताह निमित्त आरमोरीत हत्तीच्या हल्यापासुन प्रतिकात्मक संरक्षणाचे प्रशिक्षण संपन्न.
आरमोरी दि 05 ऑक्टोबर काल जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त आरमोरी मौजा शंकरनगर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व संयुक्त वन व्यवस्थापन समिती शंकरनगर यांच्या वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवनकुमार जोंग भा. व. से. परिविक्क्षाधिन वनपरिक्षेत्राधिकारी आरमोरी, प्रमुख मार्गदर्शक अविनाश मेश्राम वनपरिक्षेत्राधिकारी आरमोरी, देवानंद दुमाने अध्यक्ष, वॄक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्था आरमोरी, श्री शामजी हुल्ला पथक प्रमुख पं बंगाल व ईतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये रानटी हत्तीला नियंत्रित कसे करायचे, त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल, रानटी हत्तीपासून धान पिकाचे रक्षण करण्यासाठी त्यांना हाकलून लावण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येतात यासाठी पश्चीम बंगाल वरून खास हत्तींना परतून लावण्यासाठी सज्ज असणारे हल्ला पथकाचे प्रमुख श्री शाम भाई यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यासमोर हल्ला बनवून त्याचा वापर कशाप्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
आरमोरी येथील सर्प अभ्यासक देवानंद दुमाने यांनी सर्पविज्ञान कार्यक्रमात बिनविषारी, निमविषारी, विषारी सापाविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच सर्पदंशावर प्रथमोपचार याविषयी सविस्तर माहिती दिली. वन्यजीव व मानवात सातत्याने संघर्ष वाढत चाचला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागासह जनतेने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनकुमार जोंग यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास वनपरिक्षेत्र आरमोरी येथील वनाधिकारी, वन कर्मचारी तसेच मौजा शंकरनगर येथील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री किनेकर क्षेत्र सहाय्यक पळसगाव, श्री. बाळु अतकरे वनरक्षक जोगीसाखरा, कु सहारे मॅडम वनरक्षक मंजेवाडा, कु शेंडे मॅडम वनरक्षक सालमारा सर्पमित्र वसीम शेख, कुनाल मने यांनी परिश्रम घेतले.