स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस सोयाबीन व कापूस परिषदेत उसळला शेतकऱ्यांचा जनसागर.
परभणी दि 11 ऑक्टोबर काल सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील ताडकळस येथे ऊस सोयाबीन व कापूस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, किशोर ढगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. या ऊस परिषदेमध्ये खालील ठराव पारित करण्यात आले.
- यावर्षी ऊसाला प्रतिटन एकरकमी ३३०० रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही.
- मागील हंगामातील ऊसाला तीनशे रुपये एफ.आर.पी.सोडून ज्यादा देण्यात यावे.
- सोयाबीनला 9000 रुपये व कापसाला 12300 रुपये दर स्थिर ठेवण्यात यावा अन्यथा लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरू देणार नाही.
- चालू वर्षातील सोयाबीन वर पडलेला येलो मोझॅक रोग पिक विम्याच्या नुकसान भरपाई ग्रस्त आजारामध्ये समावेश करून नैसर्गिक आपत्ती घोषित करावी.*
- 25% अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी.
- मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी.

या परिषदेत मार्गदर्शन करताना राजू शेट्टी साहेबांनी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका केली विशेष करून केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पडण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने आदानी अंबानी सारख्या उद्योगपतींच्या हितासाठी पामतेल आणि कापसाच्या गाठी आयात करून ऐन पिकाच्या हंगामामध्ये सोयाबीन व कापसाचे भाव पाडले. जिएम सीड्स च्या लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी ही यावेळी केली. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किशोर ढगे आणि सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून हक्काचे दाम घेण्यासाठी बळ देण्याचे आव्हान या परिषदेमध्ये राजू शेट्टींनी तमाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले. ऊस परिषदेमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे,आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामप्रसाद गमे,गजानन तुरे,मुंजाभाऊ लोडे,पंडित अण्णा भोसले,रामा दुधाटे, नवनाथ दुधाटे,विष्णू दुधाटे,माऊली शिंदे,उद्धवराव जवंजाळ,निर्वळ काका,नामदेव काळे,विठ्ठल चोखट,विकास भोपाळे,गजानन दुगाने,प्रसाद गरुड,निवृत्ती गरुड,माऊली लोडे, मोकिंद वावरे,अंकुश शिंदे,मयूर वाघमारे, लवांदे, विश्वजीत जोगदंड,रामभाऊ आवरगंड, बाळासाहेब घाटोळ तसेच जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला. सदरील ऊस कापूस सोयाबिन परिषदेस असंख्य शेतकरी उपस्थित होतो.
लातूर नेता न्यूज साठी प्रतिनीधी आनंद ढोणे पाटील, परभणी.