राज्यस्तरीय तायक्वांदो रेफ्री, रिफ्रेशर सेमिनार खंडाळा येथे संपन्न !राज्यस्तरीय तायक्वांदो रेफ्री, रिफ्रेशर सेमिनार खंडाळा येथे संपन्न !

राज्यस्तरीय तायक्वांदो रेफ्री, रिफ्रेशर सेमिनार खंडाळा येथे संपन्न !

गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार

बीड प्रतिनिधी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ( ताम )आयोजित खंडाळा, पुणे येथे राज्यस्तरीय तायक्वांदो सेमिनार अतिशय उत्साहात पार पडले. या सेमिनारमध्ये जवळपास २५० पंचांनी सहभाग नोंदवला. यावेळी महाराष्ट्रातील गुणवंत राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा राज्य संघटनेकडून सत्कार करण्यात आला.

गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जवळपास ३० जिल्ह्यातून जवळपास २५० पंचानी या सेमिनारसाठी सहभाग नोंदवला . तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा महाराष्ट्र संघटनेचे महासचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, तांत्रिक समितीचे प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, अजित घारगे, सतीश खेमसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय रेफ्री, रिफ्रेशर सेमिनार अतिशय उत्साहात पार पडले. रत्नागिरी येथील राष्ट्रीय पंच शिबिरात ४५० व आता राज्यस्तरीय सेमिनार मध्ये २५० अशी जवळपास ७०० नवीन प्रशिक्षित तायक्वांदो पंच राज्य संघटनेकडे आता उपलब्ध आहेत.

आसाम या ठिकाणी पार पडलेल्या ४० व्या राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र ने सर्वप्रथम ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक पदके महाराष्ट्रातील खेळाडूंनी जिंकली. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून सन्मान झालेले प्रवीण सोनकुल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लाला भिलारे, अमोल तोडकर, पूमसे प्रशिक्षक रॉबिन आदी प्रशिक्षकांसोबतच राष्ट्रीय पदक विजेत्या निशिता कोतवाल, नम्रता श्रीनिधी काटकर, प्रसाद पाटील, मनीषा गरवालीया, कौशिक गरवालीया, वंश ठाकूर, मृनाली हरणेकर, वसुंधरा चेडे, सानिका जगताप, सोनल गंगवार या सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडू पालक व प्रशिक्षकांनी ही आपली मनोगत व्यक्त करून राज्य संघटनेच्या खेळाडू प्रशिक्षण बाबतच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त करून राज्य संघटनेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!