मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ५ सुवर्ण, ४ रौप्य, ७ कांस्यपदके प्राप्त.मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ५ सुवर्ण, ४ रौप्य, ७ कांस्यपदके प्राप्त.

मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंना ५ सुवर्ण, ४ रौप्य, ७ कांस्यपदके प्राप्त.

बीड प्रतिनिधी : मुंबई येथे पार पडलेला पडलेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण , ४ रौप्य , ७ कांस्यपदके जिंकून पुन्हा एकदा दबदबा कायम राखला आहे, अशी माहिती बीड तायक्वांदो संघटनेचे सचिव डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली आहे.

मुंबई येथे कालिदास स्पोर्ट्स स्टेडियम, मुलुंड येथे ३ री महाराष्ट्र राज्य खुली तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शौर्यचक्र पुरस्कार विजेते मधुसूदन सुर्वे, तायक्वांदो ऑफ महाराष्ट्र संघटनेचे डॉ. अविनाश बारगजे , शिवछत्रपती पुरस्कार विजेते राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, राज्य संघटनेचे कोषआध्यक्ष वेंकटेश्वरराव कर्रा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, राज्य संघटनेचे सदस्य सदस्य अजित घारगे, सतीश खेमसकर, मुंबई संघटनेचे अध्यक्ष सुनील यमगर, मुंबई संघटनेचे सचिव विजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. पुणे संघाला प्रथम स्थान, ठाणे संघ द्वितीय तर मुंबई उपनगर संघाला तिसरे स्थान मिळाले. बीड संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून ५ सुवर्ण, ४ रौप्य, ७ कांस्यपदके जिंकून पुन्हा एकदा दबदबा कायम राखला आहे.

सुवर्ण पदक विजेते खेळाडू – कु .नयन बारगजे, ऋत्विक तांदळे, यश चव्हाण, सार्थक भाकरे, मधुर मुंदडा यांनी तर रौप्य पदक विजेते खेळाडू- देवेंद्र जोशी, कार्तिकी मिसाळ, तन्वी जायभाये, कल्याणी घुगे व कांस्य पदक विजेते खेळाडू – स्वराज घोडके, सौरभ घोडके, ओम कासट, राघव तोषणीवाल, श्लोक जेथलिया, यशस्वी चव्हाण, दिव्या निर्मळ (अंबाजोगाई) यांनी मुंबईतील राज्य स्पर्धेमध्ये १६ पदके जिंकली आहेत. सर्व खेळाडू बीड जिल्हा क्रीडा स्टेडियम येथील डॉक्टर अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील असून स्पर्धेसाठी शेख अनिस, सुदर्शन गायकवाड, ऋत्विक तांदळे व देवेंद्र जोशी यांनी कनिष्ठ गटासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

या सर्व खेळाडूंना डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेशभैया क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, डॉ. अविनाश बारगजे, जया बारगजे, सुनील राऊत, बन्सी राऊत, भरत पांचाळ, मनीष बनकर, प्रा. पी टी चव्हाण, श्रीकांत पाटील, डॉ. विनोदचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, सचिन जायभाये, डॉ. शकील शेख, नवीद शेख, उज्वल गायकवाड, अमित मोरे, सचिन कातांगळे यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!