टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट तिनचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न; कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामासाठी संपुर्ण तयारी.टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट तिनचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न; कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामासाठी संपुर्ण तयारी.

टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट तिनचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न; कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामासाठी संपुर्ण तयारी.

लातूर प्रतिनिधी २३ आक्टोंबर नांदेड जिल्ह्यासह लोहा तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल व्हावा यासाठी साखर उद्योग क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सन २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेला जिरगा मारोती, शिवणी (जामगा) येथील
टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट ३ च्या द्वितीय गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे. काल रविवार दि २२ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून ट्वेन्टी वन शुगर्स युनिट ३ कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या जिरगा मारोती, शिवणी (जामगा) येथे सुरू करण्यात आलेल्या टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट ३ चा यापूर्वी २०२२ चा गळीत हंगाम यशस्वी ठरला आहे. सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या द्वितीय गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून आवश्यक ती तयारी केली गेली असून ट्वेन्टी वन शुगर्सची यंत्रणा  सज्ज ठेवण्यात आली आहे. ट्वेन्टी शुगर्स लि.युनिट ३ जिरगा मारोती, शिवणी (जामगा) ता.लोहा जि. नांदेड करिता २०२३-२४ गळीत हंगाम लवकरच सुरू होत आहे. या अनुषंगाने रविवार दि २२ ऑक्टोबर रोजी सकाळी
कारखाना साईट, जिरगा मारोती, शिवणी (जामगा) ता.लोहा जि. नांदेड या ठिकाणी गळीत हंगाम २०२३-२४ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ टवेन्टिवन शुगर्स लि.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख, जनरल मॅनेजर श्री.धनंजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत चीफ केमिस्ट श्री.अतुल स्वामी व सौ. सरोजनी स्वामी उभयताच्या हस्ते विधीवत पूजन करून संपन्न झाले. लोहा तालुका तसेच नांदेड जिल्हयासह नजीकच्या परीसरातील अतिरीक्त ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरीता राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने साखर उदयोगातील अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट ३ ची सन २०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली. लोहा तालुक्यासह नांदेड जिल्हयातील अधिकाधिक ऊसाचे गाळप करणे या कारखान्यामूळे शक्य झाले. नांदेड जिल्हा तसेच परीसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ट्वेन्टी वन शुगर्स युनिट ३ जिरगा मारोती, शिवणी (जामगा) हा कारखाना अत्यंत फायदेशीर ठरला आहे. लवकरच सुरू होत असलेल्या सन २०२३-२४ गळीत हंगामाकरिता कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी ट्वेन्टी वन शुगर्सच्या युनिट ३ च्या सर्व विभागानी जय्यत तयारी केली आहे.

सर्व सभासद व ऊस उत्पादकांच्या उसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले असून टवेन्टिवन शुगर्स लि.युनिट ३ कडून हंगामात गाळप झालेल्या उसाला चांगला ऊसदर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रसंगी खातेप्रमुख व विभाग प्रमुख सर्वश्री गोविंद देशमुख, अजितसिंग कच्छवा, सचिन शिंदे, वसंत कदम, विष्णुपंत कुलकर्णी, शेखर थावरे, संजय पतंगे, ऋषिकेश जाधव, श्रीकांत काळे, संतोष जोगे, बालाजी आगळे यांच्यासह ट्वेन्टी वन शुगर्सचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!