जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपुत्र ‘अग्नीवीर’ अक्षय लक्ष्मण गवाते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला लातूर नेता न्यूज च्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली!
दुर्दैवाची बाब म्हणजे अग्नीवीर असल्याने देशासाठी बलीदान देऊनही गवाते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्नीवीर शहीद झाल्यानंतरही त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचे समजते. ‘अग्नीवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना आहे कि काय? असा प्रश्न आता सर्व सामन्यांतून निर्माण होत आहे.