मध्यराञी अडिच किलोमीटर चालत जाऊन बनावट गुटखा फॅक्ट्रीवर लातूर पोलीसांची धाड
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाची विशेष कारवाई.
लातूर दि 27 ऑक्टोबर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या विशेष पथकातील पोलीस उपाधीक्षक श्रीमती अंकिता कणसे, पोलीस अमलदार अनिल जगदाळे, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, बाळू कांडनगिरे, चालक चव्हाण तसेच पोलीस स्टेशन निलंगा येथील पोलीस अमलदार बालाजी सोमवंशी, जीवने यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढून अत्यंत शिताफीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर पोलीस ठाणे औरद शहाजणी हद्दीत दुर्गम भागात झाडीमध्ये तयार केलेल्या एका पत्राचे शेड मध्ये चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पथकाने अडीच किलोमीटर पायी चालत जाऊन धाड टाकली त्यामध्ये गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, वेगवेगळ्या प्रकारचे कच्चे मटेरियल तसेच बनावट तयार केलेला विमल पान मसालाच्या गोन्या इत्यादी साहित्य असे एकूण जवळपास दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी श्रीनिवास गणपतराव शिवणे, वय २७ अभिषेक कालिदास बिराजदार वय २४ रा औराद यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन औरत शहाजनी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, सदरची कामगिरी पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने अवघड अशा मार्गातून यशस्वी केल्याने पोलीस अधीक्षक लातूर यांचे सह पोलीस पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे