श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते "गुणवंत क्रीडा संघटक" पुरस्कार प्रदान.श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते "गुणवंत क्रीडा संघटक" पुरस्कार प्रदान.

श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते “गुणवंत क्रीडा संघटक” पुरस्कार प्रदान.

महाराष्ट्र दिन 1 मे रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण; पांचाळ, मुंदडा व सिरसाठ यांनाही पुरस्कार.

बीड प्रतिनिधी : 01 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहरातील पोलीस मुख्यालय परेड मैदान येथे शासनाच्या क्रीडा विभागातील विविध पुरस्कारांचे वितरण राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीमती जयश्री अविनाश बारगजे यांना “गुणवंत क्रीडा संघटक” जिल्हा पुरस्काराने रोख 10 हजार रुपये रकमेसह सन्मानित करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू अविनाश पांचाळ यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, राष्ट्रीय शालेय तायक्वांदो सुवर्णपदक विजेती खेळाडु कु गौरी कमलेश मुंदडा खेळाडु पुरस्कार महिला व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता तायक्वांदो खेळाडु प्रणवकुमार दत्ता सिरसाठ गुणवंत खेळाडु पुरस्कार पुरूष यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व प्रत्येकी 10 हजार रूपये रोख देऊन जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते “गुणवंत क्रीडा संघटक” पुरस्कार प्रदान.

हा पुरस्कार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बीड मार्फत सन 2019-20 सालातील जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय परेड मैदान बीड येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजारोहन प्रसंगी उद्योग व सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री मा.ना.श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक यांची यावेळी उपस्थिती होती.

श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते “गुणवंत क्रीडा संघटक” पुरस्कार प्रदान.

यावेळी बीड जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्स, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री नवनित कॉवत, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अरविंद विद्यागर, महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी श्री अनिकेत काळे, श्री कालिदास होसूरकर, क्रीडा मार्गदर्शक श्री सतिष राठोड, श्री अविनाश पाटील, श्री रेवननाथ शेलार, श्री धनेश करांडे, श्री जितेंद्र आराक, श्रीमती त्रिगुणा वाघमोडे, श्रीमती प्रिती काळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!