19 महिन्यात लातूर ग्रामीण पोलीसांकडून मयत जनाबाईला न्याय.
लातूर दि 03 मे पोलीस ठाणे लातुर ग्रामीण हद्दीत दि 01 ऑक्टोबर 2023 रोजी मौजे कासारगांव येथे नवविवाहीता जनाबाई सुनिल घावीट वय 19 वर्ष रा. कासारगांव हिचे दि 12 मे 2023 रोजी कासारगांव येथील सुनिल दत्तात्रय घावीट याचेशी झाले होते लग्नानंतर पाच महिन्यानी दि 01 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 03 वा. जनाबाई सुनिल घावीट हिचा राहते घरी धारदार हत्यारांनी गळयावर तोंडावर वार करुन निर्घण खुन करण्यात आला होता.
सदर घटने बाबत पोलीस स्टेशन लातुर ग्रामीण यांना माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होवुन पंचनामा केला व मृत जनाबाई हिचेवर सरकारी दवाखाना लातुर येथे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी मयत जनाबाई घावीट हिचे वडील प्रभाकर साहेबराव भोसले यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे लातुर ग्रामीण येथे गुरनं 236/2023 कलम 302,498 (ब),498 अ,34, भादवी कलमा प्रमाणे फिर्यादीची मुलगी जनाबाई हिला वारंवार मोटार सायकल घेण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करुन तिचा छळ . करुन तिचा पती व मुख्य आरोपी नामे सुनिल दत्तात्रय घावीट व इतर दोन यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान के. मोरे यांचे कडे दिला होता.

सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधिक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी व सुनिलकुमार राऊत, पोलीस स्टेशन लातुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री दिपककुमार वाघमारे व अरविंद पवार यांचे मार्गदर्शनात पोउपनि श्री भगवान मोरे यांनी तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी विरुध्द सबळ पुरावे हस्तगत करुन एकुण तिन आरोपी विरुध्द मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. प्रस्तुत प्रकरणी सरकारी अभियोक्ता श्री मुंदडा यांनी फिर्यादीचे बाजुने भक्कम बाजु मांडली तसेच मा.न्यायालयाने पडताळणी केलेले साक्षीदार व सबळ पुराव्यावरुन मुख्य आरोपी नामे सुनिल दत्तात्रय घावीट यास दि 02 मे 2025 रोजी जन्मठेप व 10 हजार रुपये दंड सुनावला आहे. सदर, तपास पथकात पोउपनि श्री भगवान मोरे, पोलीस अंमलदार, सतिष लामतुरे, राहुल दरोडे, कोर्ट पैरवी लक्ष्मी शेळके, यांनी कामकाज केले आहे तर अत्यंत वेगात तपास पूर्ण करून पिढी त्यांना न्याय मिळवून देणारे पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे यांचे कौतुक केले जात आहे.