श्री त्रिपुरा महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्न इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.
लातूर प्रतिनिधी : इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्न चे निकाल 98.46% लागला आहे. यामध्ये प्रतीक्षा पायंचे हिने 90.5% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर, श्रेया इंगळे 88.83% व श्रेया लक्कू 86% या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. तसेच मानस कब्बूर (86%), सृष्टी डेरे (85.33%), शरयू केंद्रे (85.33%), अपेक्षा सावंत (85.16%), सोम्या महाजन (85%) या विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे तर संस्थेमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण मिळवणारे 5, रसायनशास्त्र विषयामध्ये 9, गणित विषयामध्ये 8 व जीव शास्त्र विषयामध्ये 5 विद्यार्थ्यांनी गुण संपादित केले आहेत.

याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव, अकॅडेमिक प्रमुख प्रा. संगम खराबे तथा प्रा. सतिष पाटील, प्रा. मुंढे मिरा, प्रा. कुलकर्णी प्रसाद, प्रा. शेख मेहराज, प्रा. तेलंग दिपमाला, प्रा. मोरे अश्विनी, प्रा. गंगथडे शुभांगी, प्रा. दिवे मेघा, प्रा. रोहित भिंगोले, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. आरती घोडके, प्रा. नेमीचंद बनसोडे यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.