
देवकरा गावात सार्वजनिक विहिरीचे गावकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन.
लातूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील देवकरा गावात जल जीवन मिशन योजनेतील मंजुर विहिरीचे नुतन सरपंच सौ वंदना कल्याण बदने यांनी गावकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन करुन एक नवा बदणे पॅटर्न तयार करत आहेत. त्या नेहमी लोकसहभागातून ग्रामपंचायतीचा गाडा हाकण्याचा मानस ठेवतात सर्व स्तरावरील लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत हि एक जण भावना या भागात बनत चालली आहे. देवकरा गावास अनेक वर्षापासुन तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. नुकतेच या गावाला जल जीवन मिशन योजना मंजूर झाली असुन या योजने अंतर्गत मंजूर विहिरीचे भुमीपुजन गावकऱ्यांच्या व सरपंच सौ वंदना कल्याण बदने यांच्या हस्ते करण्यात आले आहे. लवकरच विहिरीचे काम पुर्ण होईल आणि गावकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळेल अशी आशा सरपंच सौ बदने यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी डॉ.रामदास गुट्टे, ईश्वर फड, पिंटू फड, रामकिशन बदने, सौरभ आंधळे, दिपक फड, अशोक मुरकुटे, अर्जुन गुट्टे, सायास गुट्टे, बालाजी गुट्टे, भागवत बदने, मधुकर फड, अशोक बदने, गंगाधर बदने, भास्कर गुट्टे, लहु महाराज मुरकुटे, प्रभू गुट्टे, राम फड, बबन गुट्टे, माणिक फड, पांडुरंग सुरवसे, परमेश्वर मुरकुटे, ज्ञानोबा गुट्टे, परमेश्वर फड, त्र्यंबक फड, त्र्यंबक बदने,इंद्रजित गुट्टे,दीपक फड,बबन शेशेराव फड,अयोध्या फड, कोंडाबाई गुपले, मंगल फड, कुसुम गुट्टे, उषा मुरकुटे, रेणुका सुरवसे, शिंमिता फड, कुसुम प्रभू गुट्टे बदने, मधुकर फड, अशोक बदने, गंगाधर बदने, भास्कर गुट्टे, लहु महाराज मुरकुटे, प्रभू गुट्टे, राम फड, बबन गुट्टे, माणिक फड, पांडुरंग सुरवसे, परमेश्वर मुरकुटे, ज्ञानोबा गुट्टे, परमेश्वर फड, त्र्यंबक फड, त्र्यंबक बदने, कल्याण बदने आदीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येवर उपस्थित होते.