महिला दिनानिमित्त पोलीस प्रशासनाकडून नयन बारगेचा सत्कार.महिला दिनानिमित्त पोलीस प्रशासनाकडून नयन बारगेचा सत्कार.

महिला दिनानिमित्त बीड पोलीस प्रशासनाकडून नयन बारगजेचा सत्कार.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून कौतुकाची थाप.

बीड प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आयोजित कार्यक्रमात बीडची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू कुमारी नयन अविनाश बारगजे हिचा सत्कार खासदार प्रीतमताई मुंडे व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्याकडून नयन बारगजे हीच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल तीच्या सोबत गप्पा मारत सखोल चौकशी करून कौतुक केले.

बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० हून अधिक महिलांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे व जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते तायक्वांदो खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु. नयन अविनाश बारगजे हिचा सत्कार करण्यात आला. कुमारी नयन अविनाश बारगजे हिने तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अक्टोबर मध्ये पोखरा (नेपाळ) येथे पार पडलेल्या जागतिक तायक्वांडो संघटनेच्या जी-२ जागतिक रॅंकींग तायक्वांदो स्पर्धेत ज्युनिअर गटात कांस्यपदक जिंकले आहे. तीने ४ वेळा अखिल भारतीय पातळीवर ४ राष्ट्रीय सुवर्णपदके जिंकले आहेत तर ६ वेळा बालगट, शालेय गटात राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ६ सुवर्णपदके जिंकली आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉल येथे तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रामध्ये वडील डॉक्टर अविनाश बारगजे , आई जया बारगजे व आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ची सराव करत आहे.

महिला दिनानिमित्त बीड पोलीस प्रशासनाकडून नयन बारगजेचा सत्कार.

जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार !!

शाहू कन्या विद्यालय बीड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्याकडून महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्येही कुमारी नयन अविनाश बारगजे हीचा सत्कार जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्याशी या कार्यक्रमा दरम्यान संवाद साधून तिच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवासिनी देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक जे पी शेळके सर , डॉक्टर अविनाश बारगजे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!