श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न.
लातूर प्रतिनिधी : श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात दि.8 मार्च 2023 वार बुधवार रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ. वृंदाताई कुलकर्णी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ,प्रमुख अतिथी मा.सौ.माधुरी ताई पूर्णपात्रे सह शिक्षिका जनकल्याण निवासी विद्यालय, प्रमुख उपस्थिती मा.सौ.योगीनिताई खरे शालेय समिती अध्यक्षा व ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुनिता सूर्यवंशी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व थोर जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रमुख अतिथी सौ.मधुरीताई यांनी पूर्वीचा काळ आणि आत्ता चा काळ यात खूप फरक झालेला आहे.स्त्रियांना आता सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. एक आई म्हणून आपल्या मुलांच्या बाबतीत आपली खूप मोठी जबाबदारी आहे ती सुद्धा आपण समर्थपणे पेलत आहात.संस्कार हे काही दुकानात औषधाप्रमाणे मिळत नाहीत ,ते आपल्याला करावे लागतात. त्यासाठी आपण सतत वाचत रहा, नवे काहीतरी शिकत रहा आणि मायेचा ओलावा पेरत रहा असे मत त्यांनी व्यक्त केले

अध्यक्षीय समारोप करताना मा.सौ. वृंदाताई कुलकर्णी यांनी सर्व महिलांना आपले मानसिक,शारीरिक, व सामाजिक आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे.तसेच महिलांची, मुलींची शारीरिक स्थिती ही कशाप्रकारे बदलत असते याची माहिती करून दिली.कोणती लक्षणे दिसून आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

यानंतर आभार सौ.संपदा देशपांडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.प्रास्ताविक सौ.गवळण काजगुंडे , वैयक्तिक पद्य सौ.वैशाली तपसे आणि सूत्रसंचालन सौ.दिपाली आकनगिरे यांनी केले.