चिपळुन येथील राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी लातूर संघाची निवड.

लातूर प्रतिनीधी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे संपन्न होणाऱ्या ३२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी आज दि ११ मार्च रोजी श्री केशवराज प्राथमिक विद्यालय श्याम नगर लातूर येथे लातूर जिल्हा निवड चाचणी संपन्न झाली असुन दि १६ ते १८ मार्च दरम्यान या सब-ज्युनिअर वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धा होत आहेत. तायक्वांदो हा खेळ प्रकार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असुन ऑलम्पिक खेळ प्रकार आहे. या खेळाचा विविध स्तरांवर खेळाडुंना लाभ मिळतो. या स्पर्धेत विविध गटात मुले व मुली सहभागी झाल्या होत्या. क्युरोगी प्रकारात प्रथम क्रमांकावर श्रीनिवास पवार, सक्षम वाघचौरे, तेजस शिंदे, समर्थ बनसोड, अंश खंडागळे, प्रणव पेंटमशेट्टे, यश मठपती, अब्राहम सय्यद, विद्याधर सौदागर, श्रिया कदम, सेजल सोनकांबळे, दूर्वा बिडवे, गार्गी बनसोडे, सानवी कदम, प्रबोधनी सूर्यवंशी, अद्या माले यांची निवड करण्यात आली आहे; तर द्वितीय क्रमांकावर श्रावस्ती बनसोडे, विश्वजीत पिटले, प्रतीक जाधव, संकल्प कानगुले व तृतीय क्रमांक साठी हर्षल चव्हाण यांची वर्णी लागली आहे. व पुमसे क्रीडा प्रकारात विश्वजीत पिटले, हर्षल चव्हाण, प्रतीक जाधव, संकल्प कानगुले यांची निवड करण्यात आली आहे असे तायक्वांदो जिल्हा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे तर या स्पर्धेला पंच म्हणून धनश्री मदने, श्रुती कुलकर्णी, अदिती मेनकर, प्रेरणा सोयडे, एकता परमा यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंचे तायक्वांदो जिल्हा सचिव श्री नेताजी जाधव, महादू रसाळ, बंटी गायकवाड व अमित शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!