विविध सामाजिक संघटना व पोलीस निरीक्षक बावकर यांनी केला नुतन डिवायएसपी फुंदे यांचा सत्कार.
लातूर दि 01 जुन लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नव्यानेच रुजु झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत फुंदे यांचा शहरातील विविध सामाजिक संघटना व स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी स्वागत करुन सत्कार केला आहे. जालना येथे पोलीस निरीक्षक पदावर श्री फुंदे हे कार्यरत होते. त्यांनी पदोन्नतीवर लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पदभार स्विकारला आहे.

यावेळी वारणेचा वाघ संघटनेचे अध्यक्ष श्री आनंदभाई वैरागे, लातूरनेता न्युज चॅनेल चे संपादक श्री नेताजी जाधव वृक्षमिञ वहिदोद्दीन शेख, पि एस आय गोणारकर, हरिओम भगत, पोलीस मुन्ना पठाण, संजय बेरळीकर, मुन्ना नलवाड, किशोर पुरी, रामचंद्र ढगे, विनोद चलवाड, नारायण शिंदे, सुधीर साळुंके उपस्थित होते.