राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत नयन बारगजे ला रौप्यपदक.
महाराष्ट्र संघाला १ सुवर्ण, २ रौप्यपदक, ३ कांस्यपदके
बीड प्रतिनिधी : सीमोघा, कर्नाटक येथे पार पडलेल्या ४० व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत बीडची राष्ट्रीय खेळाडू नयन बारगजे हिने रौप्यपदक जिंकले आहे. तीचे हे ५ वे राष्ट्रीय पदक आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कर्नाटका राज्य तायक्वांदो असोसिएशन आयोजित ४० वी राष्ट्रीय जुनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२३ नेहरू स्टेडियम सिमोघा येथे ७ ते १० जुलै २०२३ दरम्यान उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये देश भरातील ३२ राज्यांतील ६५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्यपदक, ३ कांस्यपदके जिंकली. १७ वर्षाखालील वयोगटात बीडची ४ वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कुमारी नयन अविनाश बारगजे हीने ५५ किलो वजन गटामध्ये रौप्यपदक पटकावले. तिने राज्यस्तरावर ७ सुवर्णपदक जिंकले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत पुणे येथील श्रुतिका टकले हीने ५२ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नयन बारगजे (बीड) , सिध्दी बेंडाले (पुणे) यांनी रौप्यपदके तर नान्सी सिंघ, निलम जोशिलकर, अनिरुद्ध बांदल (पुणे) यांनी कांस्यपदके जिंकली. प्रवीण सोनकुल, अमोल तोडणकर, निलेश सावंत यांनी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. मनाली बेटकर, जय कासार यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

या सर्व खेळाडूंना माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर यांच्यासह महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, वेंकटेश कररा , प्रवीण बोरसे, दुलीचंद मेश्राम , सुभाष पाटील, निरज बोरसे, अजित घारगे, सतिश खेमसकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर, दिनकर चौरे, जया बारगजे, बन्सी राऊत, भारत पांचाळ, प्रसाद साहू, प्रा. पी टी चव्हाण, सुनील राऊत, श्रीकांत पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू सचिन जायभाये, नवीन शेख, अमित मोरे , सचिन कातांगळे, नितीन आंधळे व बालाजी कराड यांनी अभिनंदन केले आहे.